news today, वैजापूर येथे गुरुनानक जयंती उत्साहात ; रक्तदान शिबिर व विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

वैजापूर ता.06 - सर्वधर्मसमभावचे प्रतीक आणि मानवतेचे उपासक असलेले गुरू नानकजी यांची 556 वी जयंती म्हणजेच प्रकाश गुरुपुरब उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले.

जयंतीनिमित्त येथील गुरुद्वारात गुरुवारी (ता.06) रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत गुरूनानकजीना अभिवादन केले. या प्रसंगी दिलजीतसिंग खनिजो, प्रीती खनिजो, गोलू किशोर पंजाबी, सनमितसिंग खनिजो सामाजिक कार्यकर्ते ठाकूर. धोंडीरामसिह राजपूत, ग्यानिजी गुरूंदीपसिंग राठोड, अमरप्रित सबरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत रक्तदाते रक्तदान करीत होते. कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील संजीवनी रक्त संकलन पेढी च्या डॉ.कविता चौधरी, डॉ.मुंदडा, सहाय्यक नीता पहल, रेणुका औटी, योगिता पहल तसेच प्रवीण पवार, बाळासाहेब पगारे, सुनील सदावर्ते यांनी रक्त संकलन केले.


गुरू नानक जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात दिलजीतसिंग
खनिजो, प्रीती खनिजो, धोंडीराम राजपूत, डॉ.कविता
चौधरी, गोलू पंजाबी व ईतर

Post a Comment

0 Comments