वैजापूर, ता.29/ प्रतिनिधी -वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव ता.वैजापूर शिवाराती सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात एकट्या राहणाऱ्या महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार (वय 50 वर्ष) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूर हत्या केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी (त.28) सकाळी उघडकीस आली.
मध्यरात्री किंवा पहाटे अज्ञात व्यक्तींनी आश्रमाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आवारात प्रवेश केला. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या संगीताताई यांच्या डोक्यात वजनदार दगड टाकून त्यांचा काटा काढला.
दरम्यान चोरीच्या उद्देशाने आश्रमात घुसलेल्या अज्ञाताने त्यांची हत्या केली ही अन्य वादातून झाली यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.दरम्यान 14 एप्रिल रोजी त्यांचे शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी वाद झाला होता त्यांची तक्रार त्यांनी वीरगाव पोलीस ठाण्यात केली होती.व तक्रारीत त्यांनी माझ्या जिविताला धोका असल्याचे म्हटले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे , वीरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.श्वान पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
आश्रमात एकट्याच वास्तव्यास होत्या….
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील रहिवासी असलेल्या किर्तनकार संगिताताई पवार यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. सराला बेटाचे मंहत नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. गुजरातमधील वृदांवन येथे पाच वर्ष राहून त्यांनी अध्यात्मिक शिक्षण आत्मसात करुन परिसरात त्या कार्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.वडीलअण्णासाहेब पवार यांनी वैजापूर - गंगापूर रस्त्यावरील चिंचडगाव शिवारात दीड एकर जमीन क्षेत्र त्यांना दिले होते. त्याठिकाणी सदगुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रम कामाचा शुभारंभ सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांनी केला होता. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यासधर्म स्वीकारला होता.
झोपेत केला घात ….
कीर्तनकार संगीताताई पवार शुक्रवारी रात्री झोपेत असताना काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य वादातून त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली.
वडिलांनी जमीनीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप.
मृत किर्तनकार संगीताताई पवार यांच्या वडील अण्णासाहेब पवार यांनी जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. संगीताताई ह्या त्यांची थोरली कन्या असून दुसरी मुलगी पोलीस दलात आहे व मुलगा शेती व्यवसाय करतो.
0 Comments