वैजापूर शहरातील एका अधिकाऱ्याच्या बदलीनंतर सरकारी कार्यालयात घडलेला प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बदलीच्या दुसऱ्याच दिवशी जुन्या अधिकाऱ्याने तात्काळ काही बिले काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवीन अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार हाणून पाडण्यात आला असून, एकाच कार्यालयात दोन कुलूप लावल्याच्या घटनेने अधिकच खळबळ उडाली आहे.
सायंकाळी आदेश, सकाळीच बिलं काढायचा प्रयत्न
सदर अधिकाऱ्याची बदली झाल्याचा आदेश सायंकाळी जाहीर झाला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होताच, बदली झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या खास कर्मचार्याला (पंटरला) तात्काळ बिले तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार संबंधित कर्मचारी सकाळी 6:12 वाजता कार्यालयात हजर झाला.
व्हॉट्सॲपवर मेसेजची देवाणघेवाण
हा कर्मचारी कार्यालयात पोहोचल्याचा फोटो संबंधित अधिकाऱ्याला पाठवतो. त्यावरून अधिकारी “शो नको, रिझल्ट हवा. पाटीलशी बोला. रेडी फाईल तात्काळ आणता येईल का बघा,” असा रिप्लाय 6:26 वाजता देतात. यावरून या सर्व घडामोडी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते.
0 Comments