वैजापूर शहर व तालुक्यातील जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधील आहे----
आ--प्रा.रमेश पा बोरनारे
वैजापूर ता.,२५/प्रतिनिधी - तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्यासाठी दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य असून याला मी प्राधान्य देतो व सदैव देत राहणार. लोकहिताची कामे करीत राहणार असे प्रतिपादन वैजापूर-गंगापूर तालुक्याचे आ. प्रा.रमेश पाटील बोरनारे यांनी शहरातील एस. टी. डेपो येथे असलेल्या दत्त मंदिर परिसरातील सामाजिक सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी व बर्डी मस्जिद परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बुधवारी (ता.२५) केले. बर्डी मस्जिद परिसरातील रस्ते अत्यंत खराब झालेले होते. अनेकवेळा या रस्त्यावर अपघात झाले होते. म्हणून तेथील रहिवाशांची बऱ्याच दिवसाची मागणी होती ती पूर्ण होत आहे. डेपो परिसरातील दत्त मंदिर येथे धार्मिक व सामाजिक उत्सवसाठी सामाजिक सभागृह असावे अशी मागणी या परिसरातील नागरिक व एस. टी. वाहक -चालक व कर्मचारी यांची होती. आ.बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नातून या दोन्ही ठिकाणी सभागृह व रस्त्याच्या कामासाठी पन्नास-पन्नास लाख रुपये निधी आमदार बोरनारे यांनी उपलब्ध करून दिल्याने ही कामे आरंभ झालेली आहेत.
येत्या काही दिवसात जुनी भाजी मंडई ,(गांधी रोड) येथे सुसज्ज भाजी मंडई चे काम आरंभ होणार व अद्यावत स्मशान भूमी चे काम ही पूर्ण होईल या दोन्ही ठिकाणच्या अद्ययावत बांधकामासाठी आ.बोरनारे यांनी प्रत्येकी पांच-पांच कोटी रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला आहे. यास्तव माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते साबेरखान यांनी वैजापूरचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शासनाचे दोन पुरस्कार विजेते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते आ.रमेश पा. बोरनारे यांचा विशेष सत्कार घडवून आणला. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मा. नगराध्यक्ष साबेरखान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी बापू जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण पाटील कवडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, दामोदर पारीख, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटीलसाळुंके, शहरप्रमुख पारस घाटे. डॉ,राजीव डोंगरे, कय्युम सेठ सौदागर, आगार प्रमुख किरण धनवटे, एल.एम.पवार, खुशालसिंग राजपूत, अंकुश हिंगे, आनंदा निकम, डॉ.निलेश भाटिया, सखाहरी बर्डे, स्वप्निल जेजुरकर, रणजित चव्हाण, भाजपाच्या जयमाला वाघ, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, सुप्रिया व्यवहारे,छाया बोरनारे,संजय बोरनारे, सुनीता साखरे, ज्ञानेश्वर अदमाने , महेश बुणगे, कलमलेश आंबेकर, खलील मिस्त्री, हमीद कुरेशी, श्रीकांत साळुंके, शंकर मुळे, रामकीसन जोरे, संतोष वाघ, हमीद कुरेशी, अमीर अली, अशोक देवकर, अमोल बोरनारे, सचिन पवार यांची उपस्थिती होती. आगार प्रमुख किरण धनवटे, राजू मुळे, दीपक तुपे, आजीनाथ मुळे, पंढरीनाथ जाधव,जी ठाकूर, एस. जे.पवार, वाल्मिकी बावचे, वंदना निकम, मनीषा मोरे, वैशाली साठे, क्षीरसागर, अर्जुन थोट यांनी उपस्थित सर्वांचे शाल देऊन स्वागत केले. सूत्रसंचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले. आभार किरण धनवटे यांनी मानले.
0 Comments