news today, वैजापूर येथे 38 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर, ता.03 / प्रतिनिधी - शहरातील लाडगांव रस्त्यावर असलेल्या पंडित काका नगर परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी  (ता.03) दुपारी घडली. भरत मच्छिंद्र पाटील (वय 38 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments