वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाची सर्वसाधारण सभा संपन्न
वैजापूर ता,03 / प्रतिनिधी - जगातील बहुतेक जेष्ठ नागरिक स्मृतिभ्रंश या विस्मरण आजाराने पछाडत आहेत. त्यांची विस्मरण शक्ती झपाट्याने वाढत आहे. हा आजार टाळण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी अधिक बोलके बनावे
तसेच त्यांनी अधिक कृतिशील बनून स्वतः सक्षम, सुदृढ व निरोगी रहावे जेष्ठ विधिज्ञ राजगोपाल मालपाणी यांनी रविवारी (ता.03) येथे वैजीनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.
नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ॲड.मालपाणी बोलत होते
ते पुढे म्हणाले की, जेष्ठ नागरिकांनी स्वतः च्या आरोग्याकडे जातीने लक्ष द्यावे. प्राणायम व योगासने करून शक्य होईल तेवढे पायी फिरावे तसेच दर सहा महिन्याला आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे स्वतः दक्ष रहावे.
सभेच्या अध्यक्षस्थानी वैजीनाथ जेष्ठ संघाचे प्रकाशशेठ बोथरा होते तर व्यापारी संघाचे अध्यक्ष काशिनाथ गायकवाड, आधार जेष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव साळुंके, चैतन्य जेष्ठ नागरिक संघाचे साहेबराव साळुंके, जेष्ठ नागरिक गोपालदास आसर, श्री. एम.जी.गणोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला भारत मातेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी 41 जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी रविंद्रआप्पा साखरे व सुरेश संत यांनी मनोगत व्यक्त केले. तर अशोक धसे यांनी साने गुरुजी यांची 'खरा तो एकची धर्म, ही प्रार्साथना सादर केली. संपतराव डोंगरे यांनी पसायदान म्हटले. सूत्र संचलन संघाचे सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार बाबासाहेब गायकवाड यांनी मानले.
या प्रसंगी संचालक सुभाष बोहरा, बबनराव क्षीरसागर, भगवान सिंह राजपूत, मुकुंद दाभाडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम, नारायणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक पवार खंडाळकर आदींनी सहभाग नोंदविला. सेवानिवृत्त प्रा. किसन बोरनारे, रामकृष्ण साठे, माजी प्राचार्य संपतराव साठे, अण्णासाहेब शेळके, सुदामआप्पा गोंधळे, पी,वाय, चव्हाण, श्री दिसले यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.(
0 Comments