news today, नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे संजय बोरणारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वैजापूर, ता.13 -  वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.13) नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील बोरणारे यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केला. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुनील सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना संजय बोरणारे सोबत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, खुशालसिंह राजपूत आदी ...

आ.रमेश पाटील बोरणारे यांचे धाकटे बंधू संजय पाटील बोरणारे यांना शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय बोरणारे यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, खुशालसिंह राजपूत, इरफान सेठ, अमोल बोरणारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  



Post a Comment

0 Comments