नगराध्यक्ष पदासाठी संजय बोरनारे यांचा अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना साळुंके ललिता दिपक त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी ...
वैजापूर, ता.13 - वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदासाठी सतरा असे अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे चौथ्या दिवस अखेर नगरसेवक पदासाठी दाखल अर्जाची संख्या वीस झाली आहे. दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन यांनी प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर तिसऱ्या दिवशी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले.
.नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनारे यांचे बंधू संजय नानासाहेब बोरनारे यांनी शिवसेनेतर्फे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केला. त्यांच्यासोबत आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, खुशालसिंह राजपूत उपस्थित होते.
आज दाखल झालेले उमेदवारी अर्ज ....
प्रभाग क्रमांक - 2 ) त्रिभुवन लीलाबाई मधुकर (शिवसेना)
त्रिभुवन रश्मी विशाल (शिवसेना)
बोर्डे विमलबाई नामदेव. ( शिवसेना)
प्रभाग क्रमांक - 3 ) त्रिभुवन रश्मी विशाल (शिवसेना)
त्रिभुवन लीलाबाई मधुकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक - 4) जेजुरकर स्वप्नील विष्णू (शिवसेना)
जेजुरकर वर्षा स्वप्नील (शिवसेना)
जोशी प्रतीक्षा विजय. ( शिवसेना)
प्रभाग क्रमांक - 5) चौधरी जयश्री सावन (शिवसेना)
प्रभाग क्रमांक - 7) त्रिभुवन राहुल कारभारी (शिवसेना)
साळुंके ललिता दिपक (शिवसेना)
प्रभाग क्रमांक - 8) साळुंके सोनल श्रीकांत. (शिवसेना)
पुतळे बाबासाहेब सुखदेव (शिवसेना)
प्रभाग क्रमांक -10) बुणगे ज्योती महेश. (शिवसेना)
बोरनारे छाया रंभाजी (शिवसेना)
प्रभाग क्रमांक -11) मगर सोनाली चंद्रशेखर (शिवसेना)
--------------------------------------------------------------------
0 Comments