छञपती संभाजीनगर, ता.03 - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रभारींची महत्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.03) छञपती संभाजीनगर येथे पार पडली.
या बैठकीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संघटनात्मक मजबुती, प्रभावी रणनीती, कार्यकर्त्यांची भूमिका व जबाबदाऱ्या यावर सखोल आणि मार्गदर्शक चर्चा करण्यात आली. निवडणुकांमध्ये भक्कम संघटन, नियोजनबद्ध कामकाज आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यश निश्चित करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी राज्याचे ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौंडगे, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, प्रदेश सचिव किरण पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments