news today, खंडाळा शिवारात ट्रकला धडकून मोटरसायकलस्वार जागीच ठार

वैजापूर, ता.25 - वैजापूर - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर खंडाळा कृषी महाविद्यालय समोर भीषण अपघात होऊन या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी (ता.25) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. भगवान गणपत इंगळे (वय 24, रा.शिरोडी, कन्नड) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 एच वरील खंडाळा येथील कृषी महाविद्यालया समोर वैजापूरकडून येणाऱ्या एम.एच. 20 जी.झेड.0025 क्रमांकाचा आयशर व शिऊरकडून येणारी एम. एच. 20 एच.डी.2269 क्रमांकाची टिव्हीएस कंपनीची रायडर्स दुचाकीचे टायर फुटल्याने समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार भगवान इंगळे (२4) रा. शिरोडी (औरळा) ता.कन्नड हा जागीच ठार झाला.

प्रत्यक्षदर्शनीं सांगितले की, दुचाकी गाडीचा वेग पाहता इतका भयानक होता की दुचाकीचा अक्षरशा चुराडा झाला. यानंतर अपघातातील व्यक्तीला रुग्णांवाहीकेत उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे नेण्यात आले. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप नरवडे, पोलीस पाटील नितीन बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहने ताब्यात घेण्यात आली

            अपघातात ठार झालेला भगवान इंगळे 

भगवान एकुलता एक मुलगा..

भगवान हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या पाठीमागे आई वडील, बहीण असा परिवार आहे. तो शेती व्यवसाय करत होता. शनिवारी सकाळी तो दुचाकीवर वैजापूरच्या दिशेने येत होता. त्यावेळी खंडाळा शिवारात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला धडकल्याने त्याच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. नागरिकांनी त्याला तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची वैजापूर पोलिसांत नोंद घेण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments