news today, कै.डॉ.व्हि.जी.शिंदे यांना वसंत क्लबतर्फे श्रध्दांजली

वैजापूर, ता.14 - शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दलीत मित्र तथा वसंत क्लब वैजापूर चे उपाध्यक्ष डॉ. व्हि.जी.शिंदे यांना वसंत क्लब वैजापूरतर्फे रविवारी ((ता.14) भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 

क्लबच्या सभागृहात सायंकाळी श्रध्दांजलीचा कार्यक्रम पार पडला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, डॉ.एस.एम.जोशी, मेजर सुभाष संचेती, ॲड.सचिन दहिभाते, ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, डॉ.संतोष गंगवाल, प्रा. विठ्ठलसिंह ढाकरे, ॲड.बाबूराव परदेशी आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

याप्रसंगी पी.जी.पवार, क्लबचे माजी सचिव जफर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, भाऊसाहेब गलांडे, दादासाहेब फोपसे, राजू संघवी, प्रा.के.एम.बोरनारे, प्रा.के.ए.मगर, हरिदास आसर, देविदास वाणी ,कय्युमसेठ सौदागर, भगवानसिंग राजपूत, घनशाम वाणी, विलास रामैय्या, दीपक साळुंके, सलीम वैजापुरी, डॉ.निलेश भाटिया, सावन राजपूत, राजेंद्र केदार, महेश बुणगे, ॲड.दत्तात्रय जाधव, प्रकाश वर्मा, वसंतराव कदम, संजय तांदळे, यांच्यासह क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments