वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी मिळवला मराठवाड्यातील सर्वात कमी वयातील ब्लॅक बेल्टसह उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
वैजापूर, ता.10 - येथील विजेता स्पोर्ट्स असोसिएशनची खेळाडू गाथा गिरीश चापानेरकर हिने रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी मराठा मंदिर हॉल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आठ वर्षे वयोगटातील कुमिते प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच काता प्रकारातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला स्मृतिचिन्ह देण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गाथाला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
विशेष म्हणजे, कुंग-फू कराटे मार्शल आर्टमध्ये आपल्या वयोगटात मराठवाड्यातील पहिली ब्लॅक बेल्ट मिळविणारी खेळाडू म्हणून गाथाने मान मिळविला आहे. तिला ब्लॅक बेल्ट, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गाथा गेल्या तीन वर्षांपासून विजेता स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल नगराध्यक्ष दिनेशसिंह परदेशी, मुख्याध्यापिका शिल्पा परदेशी तसेच प्रशिक्षक, शिक्षक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.
0 Comments