news today, सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा - शिवसेना नेते आ.अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती संभाजीनगर, वेरुळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते आ.अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही आमदार दानवे यांनी केला आहे. 

शिक्षक सुरेश बोरसे यांना वाहनात का नेण्यात आले, त्यांना मारहाण का करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन का करण्यात आले या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे ...

'तुम्ही कोण आहात' असा साधा प्रश्न विचारला म्हणून जीवाची किंमत मोजावी लागलेल्या सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे.  त्यानुसार गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांनी रत्नपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजसह इतर माहिती घेतली. त्यानंतर राजपूत यांनी वेरुळ येथे जाऊन बोरसे कुटुंबीयांचीही भेट घेतली. या प्रकरणात मंगळवारी प्रत्यक्षदर्शींचा जबाब ऑनलाईन नोंदवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments