news today, रोहित पठारे यांच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींविरुध्द मोका लावा - आंबेडकरवादी पक्ष संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून पठारे कुटुंबीयांना न्याय द्या - मागणी 

वैजापूर, ता.08 - वैजापूर येथील रोहित अनिल पठारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले.

रोहित पठारे यांची निर्दयी आणि अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींनी संघटितपणे कट रचून अमानुष कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करून या हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार शोधावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, रमेश गायकवाड, बंडू कांबळे, सुरेश पाटील, विजय वाहुळ, विशाल इंगळे, मोहन म्हस्के, नाना म्हस्के, किरण मांदळे, नरेश पाखरे, नितीन आढमाने, मुकेश खोतकर, रवी मगर, धर्मेंद्र बनकर, सोनू नरवडे, संदीप जमधडे, अभिजित शरणागत, सागर बागुल, अभिमन्यू आंभोरे, अजय राठोड, कपिल बनकर, मिलिंद जमधडे, आनंद गायकवाड यांच्यासह प्रशांत त्रिभुवन, विजय मोकळे, आबासाहेब कसबे, राजवीर त्रिभुवन, अंकुश पठारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. रोहित पठारे यांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments