news today, रोहित पठारे हत्याकांड प्रकरणी 10 आरोपींना अटक ; आरोपींना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वैजापूर, ता.07 - रोहित पठारे हत्याप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलीस ठाण्याची विविध पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    
तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पोळ यांनी आरोपींना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता ॲड.नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे भक्कमपणे बाजू मांडली.

अमन सत्यपाल उंटवाल (वय 24, रा. मारवाडी गल्ली, वैजापूर), आनंद संतोष मथुरे ऊर्फ राजपूत, अमर मदनसिंह राजपूत, शंकर ऊर्फ प्रतीक राजू राजपूत, गजू ऊर्फ गजेंद्र रविंद्रसिंह राजपूत, क्रिश प्रीतमसिंह राजपूत, लोकेश ऊर्फ सोनू गबरसिंह राजपूत (चोर), प्रमोद ज्ञानेश्वर वाघचौरे, मयूर बाबासाहेब राहणे (रा. भगाव, ता. वैजापूर) विशाल सामदास कडे (रा. शिवाजीनगर, जुने चांडगाव, वैजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक नऊ आणि दहा यांना गुन्हा क्रमांक 698/26 मध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्याने संभाव्य हल्ला टळला.
    ही कारवाई पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव आणि प्रभारी अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिवीक्षाधीन उपपोलीस अधीक्षक तथा वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, विठ्ठल झांजुर्ण तसेच पोलीस कर्मचारी लहुजी घोडे, भारत निकाळजे, रामेश्वर ढाकणे आणि युवराज पाडळे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments