news today - वैजापूर हत्याकांड : आझाद समाज पार्टीच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांशी भेट ; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ! आतापर्यंत दहा आरोपींना अटक

वैजापूर, ता.07 - वैजापूर येथील रोहित अनिल पठारे यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या संदर्भात आज आजाद समाज पार्टी (कांशीराम), छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्यावतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.


राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आजाद समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, तपास निष्पक्ष व वेगाने करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.

पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आजाद समाज पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी अरविंद कांबळे  (प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी)
काशिनाथ भांडेगावकर (प्रदेश सचिव) शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष) तातेराव ससाणे (मराठवाडा कार्याध्यक्ष)
 कैलास गायकवाड (मराठवाडा महासचिव) राहुल साबळे ( जिल्हा प्रभारी) विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष) अनामि मोरे (युवा जिल्हाध्यक्ष) शेख जावेद (शहराध्यक्ष), रेखा राजभोज ( शहर अध्यक्ष, महिला) शेख मुनीर, नितीन वाहूळ,शेख अल्ताफ, अरुण पगारे, राहुल जाधव, शेख समीर, शेख साबेर, नूरजहाँबेगम बेगम, मिलिंद वाहुळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments