news today, 'लाडकी बहीण' योजनेचा 12 हजार 431 भावांनी घेतला लाभ !

2 हजार 400 सरकारी कर्मचाऱ्यांनाही घेतला योजनेचा लाभ ...

मुंबई,ता.23 - राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचा तब्बल 12 हजार 431 भावांनी 13 महिने प्रत्येकी 1 हजार 500 रुपये लाभ घेतल्याचे पडताळणीत उघड झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.


लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12 हजार 431 पुरुष लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. त्याचसोबत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशा 77 हजार 980 महिलांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना 12 महिन्यापर्यंत ही रक्कम मिळाली. बोगस पुरुष लाभार्थींच्या खात्यात 25 कोटी तर अपात्र महिलांच्या खात्यात सरकारचे 140 कोटी रुपये गेले. एका इंग्रजी दैनिकाने या संदर्भात वृत्त दिले आहे.

सध्या 2 कोटी 41 लाख म्हीलया योजनेचा लाभ घेत आहेत. ज्यातून सरकारी तिजोरीवर 347 कोटींचा आर्थिक भार पडत आहे. 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा चुकीचा लाभ घेतला.सरकारने अद्याप अशा अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसुली केली नाही. 

Post a Comment

0 Comments