फरदीन सय्यद
----------------------
वैजापूर, ता.08 - ग्रामीण भागाच्या विकासाचे माध्यम असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता.07) तालुक्यातील 281 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 48.76 टक्के तर सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 71.80 टक्के मतदान झाले. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे. देव सोमवारपर्यंत पाण्यात असणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 36 तर पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात असून तालुक्यातील वांजरगांव, लासुरगांव, घायगांव, शिऊर व वाकला या गटातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. तर पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात असून बहुतेक पंचायत समिती गणांमध्येही अत्यंत चुरशीची व वर्चस्वाची लढत झाली. पंचायत समितीवर कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचे चित्र सोमवारीच निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, ज्येष्ट नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकील सेठ यांनी परिश्रम घेतले.यातून कोणत्या पक्षातील उमेदवार कोणास सरस ठरले, हे निवडणूक निकालानंतर समोर येणार आहे.
वैजापूर तालुक्यात गटनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे...
वाकला - 67.47 टक्के
बोरसर - 70.26 टक्के
शिऊर - 67.24 टक्के
सवंदगांव - 73.99 टक्के
लासूरगांव - 73.31 टक्के
घायगांव - 76.27 टक्के
वांजरगांव - 78.63 टक्के
महालगांव - 68.69 टक्के
________________________________________________
0 Comments