news today, वैजापुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री अतुल सावे यांची प्रचार फेरी

वैजापूर, ता.24 -  नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख मार्ग व गल्लीबोळातून फेरी व पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.24) शहरातून ओबीसी व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यावेळी मंत्री सावे यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

सकाळी दहा वाजता डेपो रोडवरील संभाजी चौकपासून या प्रचार फेरीस सुरुवात झाली. शहरातील विविध मंदिर व महापुुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन ही फेरी महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरात पोहचल्यानंतर तेथे फेरीचा समारोप करण्यात आला. राज्याचे ओबीसी व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब संचेती,अविनाश पाटील गलांडे, विशाल संचेती, दशरथ बनकर, नारायण पाटील कवडे, सुरेश राऊत, दामोदर पारीक, बजरंग मगर, ज्ञानेश्वर जगताप, कैलास पवार, गौरव दौडे, शैलेश पोंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अकील सेठ, पंकज ठोंबरे यांच्यासह नगरसेवकपदाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Post a Comment

0 Comments