news today, वैजापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ; कुत्र्याच्या चाव्याने चिमुकली जखमी

वैजापूर, ता.04 / प्रतिनिधी - शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. झुंडीने कुत्रे रस्त्यावर व गल्लीबोळात फिरताना दिसत असून कॉलनी परिसरात पिसाट कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याने एक लहान चिमुकली गंभीररीत्या जखमी झाली आहे.
शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी कुत्र्यांचं राज्य असतं. भटक्या कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.


शहरातील कॉलनी परिसरासह टिळक रोड, महात्मा गांधी रोडवरया भागात मोकाट कुत्रे घोळक्याने फिरताना किंवा ठिय्या मांडून बसलेले दिसतात. कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
.      कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेली चिमुकली 

शहरातील कृष्ण मंदिर परिसर, यशवंत कॉलनी, हुतात्मा जगन्नाथ कॉलनी येथे एक कुत्रा पिसाळलेला आहे  त्याने याच परिसरात 10 ते 12 जणांना चावा घेतला आहे. सरकारी रुग्णालयात अँटी रॅबिज उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही जणांना छञपती. संभाजीनगर येथे हलवावे लागल्याची शहरात चर्चा आहे.


 












Post a Comment

0 Comments