वैजापूर, ता.09 - तालुक्यातील डाक पिंपळगाव येथील रहिवासी स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण राधाजी उघडे यांचे सोमवारी (ता.09) सकाळी निधन झाले. या समयी त्यांचे वय 102 वर्ष होते. सायंकाळी चार वाजता छत्रपती संभाजीनगर येथून पोलीस अधिकारी राजाराम रावसाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पोलीस पथकाने त्यांना सलामी दिली.
शासनाच्यावतीने येथील उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व तहसीलदार सुनील सावंत यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार दत्तात्रय कांबळे, डाक पिंपळगावच्या तलाठी मंगला वाघमारे, तलाठी गजानन जाधव, मंडळ अधिकारी जितेंद्र चापानेरकर यांनी तसेच ॲड. प्रमोददादा जगताप व सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. कै. लक्ष्मण राधाजी उघडे यांच्या पश्चात दोन विवाहित मुले व दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ॲड. प्रमोददादा जगताप, नायब तहसीलदार श्री.कांबळे, बिपीन साळे, शिंदे, राम पिलदे, अहिल्यानगरहून आलेले स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग गणपत शिंदे, नगरसेवक विशालशेठ संचेती, स्वप्नील जेजुरकर, लिमेश वाणी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भाजपचे चांगदेव उघडे यांचे ते वडील होत. डागपिंपळगाव ग्रामस्थ व स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments