वैजापूर, ता .10 - वैजापूर तालुक्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघेजण ठार झाले तर आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात दोन दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. प्रवीण सुरेश चव्हाण (वय 25, रा. कुंभार गल्ली, वैजापूर) व विलास भिकाजी खावले (वय 32 रा.नारेगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे असून राम अर्जुन भुमरे (रा.पैठण) हा जखमी झाला आहे. त्यांना येथील वैजापूर उपजिल्हा रुग्णलयात अपघातानंतर दाखल केल्याची माहिती आहे. तर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर कोल्ही घाटात भरधाव रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात सायगाव ता.कन्नड (हल्ली मुकाम-छञपती संभाजीनगर) येथील अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.अश्विनी सिद्धार्थ अभंग असे अपघातातील मृत तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश सिद्धार्थ अभंग (25 वर्ष, रा. छञपती संभाजीनगर), शिल्पा संकेत साळवे (35 वर्ष रा. धोंदलगाव), दिक्षा रेवण शिरसाट (33 वर्ष, रा. चिकलठाणा) व पूनम राजू जाधव (25 वर्ष, रा.गारखेडा) या तीन महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.
तिसरा अपघात महालगांवजवळ घडला. कुत्रा आडवा गेल्याने मोटारसायकल घसरून झालेल्या या अपघातात पती-पत्नी व दोन लहान मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेले हे सर्व जण सिन्नर येथील असल्याचे समजते.
0 Comments