खासदार भुमरे यांना निवेदन देताना हिगोणी, कांगोणी येथील शेतकरी
हिंगोणी, कांगोणी व नारायणपूर येथील शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी, हिंगोणी येथील के टी वेअर दुरुस्त करून देण्यात यावा, ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच हिंगोणी व कांगोणी येथील नदीवरती पूल बांधण्यात यावा जेणेकरून कांगोणी व नारायणपूर या गावांचा हिंगोणी गावाशी असलेला संपर्क तुटणार नाही आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खासदार भुमरे व आमदार बोरणारे यांनी आश्वासित करून उपस्थित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना त्या संबंधाने सूचना केल्या.
खा.भुमरेनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या..
अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुराने वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये थैमान घातले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत आ.बोरणारे यांनी हिंगोणी, कांगोणी, लाखगंगा, बाबतारा, पुरणगाव, बाभूळगाव गंगा, नांदूरढोक, सावखेड गंगा, वांजरगाव, भालगाव, डाग पिंपळगाव, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ या गावांना भेट देऊन पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली.
या संकटाच्या काळात शासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.शेतकरी व नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तुमच्या पाठीशी नेहमी उभा आहे. असे खा.भुमरे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड, उपजिल्हाप्रमुख.बाबासाहेब पाटील जगताप, तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments