छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागातील फर्स्टक्राय इंटेलीटॉट्स शाळेतील प्रकार...
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरात असलेल्या फर्स्टक्राय इंटेलीटॉट्स प्रीस्कूलमध्ये 22 महिन्याचा मुलगा बालवाडीत शिक्षण घेतो.नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. त्याच्या वर्गातील इतर मुलेही होती. सकाळी अकरा वाजता वर्गात सगळे मुले असताना मदतनीस महिलेने एका मुलाला वर्गाच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर बाहेरून दरवाजा बंद केला. त्यानंतर तब्बल अर्धातास दरवाजा बंद होता. मात्र, या दरम्यान वर्गात शिकणाऱ्या एका समवयस्क मुलाने या मुलाला मारहाण करून अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. यादरम्यान शाळेतील कर्मचारी किंवा मदतनीस वर्गाकडे फिरकला नाही. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बालवाडीत मुलाला झालेल्या मारहाणीस शाळेचे प्राध्यापक कांचन येवले, सीईओ शुभम महेश्वरी, विजय रेड्डी, रिजनल मॅनेजर मंगेश मुसाळे, शाळेतील मदतनीससह इतर लोक जबाबदार असल्याची तक्रार मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांनी दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात वरील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णू मुंढे करीत आहेत.
0 Comments