news today, वैजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने स्मार्ट मीटर व वीजेच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन

वैजापूर, ता .25 - शहर व  तालुक्यात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढीव वीजबिले, वारंवार वीज खंडित होणे व निकृष्ट वीजसेवेच्या विरोधात वैजापूर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने महावितरणचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तसेच याबाबत शहरात जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

काँग्रेसतर्फे वैजापूर येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

तालुका काँग्रसचे अध्यक्ष राहुल संत यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांची चौकशी करावी. ग्राहकांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा करावा .वारंवार होणारे वीज खंडित होणे थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करावे.अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाबासाहेब गायकवाड, सुशील आसर, डॉ. नितेश शहा, रोहित आहेर, प्रवीण खाजेकर. अक्षय रोठे, साहेबराव पडवळ, शाक्यसिंह त्रिभुवन आदी उपस्थित होते.
मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला. 

Post a Comment

0 Comments