वैजापूर ता.25 - येथील संतोष धोंडीरामसिंह राजपूत यांची कन्या युविका संतोष राजपूत यांनी आय.आय.टी.प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गातून देशात 15 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. त्यांचा प्रवेश आसाम राज्यातील गोहाटी येथील शासकीय आयआयटी महाविद्यालयात झाला. या यशाबद्दल युविका महाराष्ट्र राज्य राजपूत परदेशी विकास महासंघाच्यावतीने शुक्रवारी (ता.26) छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार करण्यात आला.
संत एकनाथ रंग मंदिर येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात आमदार श्वेताताई महाले व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याहस्ते स्मृती चिन्ह, सन्मान पत्र देऊन हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, समाज कार्यकर्ते, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोताराम बहुरे होते. परदेशी विकास महासंघाचे राज्याध्यक्ष विश्वनाथ नंदलाल राजपूत यांनी प्रास्ताविक केले.आ.श्वेताताई महाले, आ.प्रदीप जैस्वाल, एसीपी अशोकसिंह राजपूत, मुख्याधिकारी भागवत बिघोत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांची समयोचित भाषणे झाली.
या प्रसंगी चत्तरसिंग महेर, ॲड.नरेंद्रसिंग शेवंगण, डॉ.गीता शेवंगण, भीमसिंग कहाटे, जिल्हाध्यक्ष फुलसिंह राजपूत, राजेंद्रसिंह राजपूत, कल्पनाताई राजपूत, रेखाताई काकरवाल, चंदा राजपूत, प्राचार्य गुरुदत्त राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील राजपूत-परदेशी समाजाचे विद्यार्थी - पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. युविका संतोष राजपूत या वैजापूरचे सेवानिवृत्त
शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची नात आहे.
0 Comments