वैजापूर ता.28 - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाला वैजापूर शहर व तालुक्यात रविवारी (ता.28) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहरात 23 केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पालकांनी आपल्या एक दिवसाच्या बाळापासून ते पांच वर्ष वयापर्यंतच्या छोट्या मुलांमुलींना लसीकरण बुथवर आणून लसीचे दोन थेंब पाजून घेतले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे व नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद हरबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर मुंडे, भागीनाथ मगर व जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून शुभारंभ केला.
शहरात लसीकरणांचे 23 केंद्र होते यावर 63 आरोग्य कर्मचारी व 5 सुपरवायझर व 5 वैद्यकीय अधिकारी निरीक्षणसाठी नियुक्त होते. त्याचप्रमाणे एक फिरती लसीकरण व्हॅन ही वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरबडे यांनी नेमलेली होती. या केंद्रावर सकाळ पासूनच पालकांनी आपल्या चिमुकल्यासह गर्दी केली होती. जी बालके लसीपासून वंचित राहिली आहेत त्यांच्यासाठी सोमवार(ता.29) पासून ते शुक्रवार(ता.03 जुलै )पर्यंत घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपल्या राहिलेल्या बाळांचे या कालावधीत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ.हरबडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील केंद्रावर पालकांनी वरील काळात जाऊन आपल्या पांच वर्षा आतील मुला-मुलींचे लसीकरण करून घेतले आहे. या मोहिमेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पायाळ, डॉ.धोत्रे, मुख्य परिचारिका श्रीमती मोहाडीकर, श्रीमती जंगम, श्रीमती मनीषा, श्रीमंती सातदिवे, किशोर वाघुले, विजय पाटील, श्री चौधरी, श्री.मापारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
0 Comments