news today, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक ; आठ जण बिनविरोध, 31 उमेदवार निवडणूक रिंगणात

मंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश पाटील बोरनारे, डॉ.दिनेश परदेशी बिनविरोध ; दिग्गजांची निवडणुकीतून माघार 

छत्रपती संभाजीनगर, ता.24 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, आ. रमेश पाटील बोरणारे, डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह आत जण बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा बँकेत शिवसेनेचा सध्या वरचष्मा आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 83 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यासाठी 4 जुलै रोजी मतदान होणार आहे.

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवार (ता.23)  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही जणांनी प्रयत्न केले,परंतु बँकेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याने बिनविरोधच्या प्रयत्नाला अपेक्षत यश आले नाही. या प्रयत्नात मंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश पाटील बोरणारे,आमदार विलास भुमरे, डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर,अनिल बोरसे (फुलंब्री), अर्जुन गाढे (सिल्लोड), संदीप निका (खुलताबाद) हे आठ जण बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 12 जागांसाठी ही निवडणूक होत असून 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 

निवडणुकीतून दिग्गजांची माघार ...
उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले  83 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये बँकेचे माजी संचालक जयराम साळुंके,आप्पासाहेब रामकृष्ण पाटील,  किशोर शितोळे, रामराव शेळके, सुहास शिरसाट, रमेश पाटील, संदीप बोरसे, किशोर धनायत, गोकुळसिंग राजपूत, एकनाथ जाधव या
दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता 39 उमेदवार रिंगणात आहेत.या निवडणुकीत मंत्री अतुल सावे हेही उतरले असल्याने 
भाजपने जिल्ह्याच्या सहकारात अधिक लक्ष घातले असल्याची चर्चा आहे.



Post a Comment

0 Comments