वैजापूर, ता.21 - भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस रविवारी (ता.21) मोठ्या उत्साहात आणि सामूहिक सहभागातून साजरा करण्यात आला.
वैजापूर पालिकेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आयुष मंत्रालय (भारत सरकार) व INO चे को-ऑर्डिनेटर (मराठवाडा), नाडीयोग तज्ज्ञ डॉ.अशोक सरोदे, योग प्रशिक्षक विजय (बापू) देशमुख, जिल्हा सहसंयोजक प्रेमभाऊ राजपूत, वैजापूर संयोजक गिरीष चापानेरकर, सहसंयोजक प्रा.जवाहर कोठारी, प्रकाश माळी, शैलेश पोंन्दे तसेच सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, प्रशांत कंगले, शिल्पाताई परदेशी, विशाल संचेती, जयमालाताई वाघ, वैशाली पवार, जयश्र बागुल, कैलास पवार, संदीप ठोंबरे, शहराध्यक्ष बजरंग मगर, ज्ञानेश्वर आदमाने, दादाभाऊ मापारी, अनिल वाणी, सुनील घोलप, सन्मित पाजी, भीमाशंकर साखरे, महेश भालेराव, उघडे, विशाल टेके, किरण खरोटे, अशोक निकम यांची उपस्थिती होती. वैजापूर योगा ग्रुप, सायकल ग्रुप, NCC विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि महिला वर्ग यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक यशस्वी केला.
निरोगी आयुष्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व या सामूहिक योग प्रात्यक्षिके व प्राणायाम कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना पटवून देण्यात आले.
0 Comments