news today, विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी

छत्रपती संभाजीनगर सुहास शिरसाट विजयी 
नाशिक मतदारसंघात दराडे पराभूत  ; अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी...

मुंबई, ता.22 - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत भाजप 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा निकाल लागला आहे.

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून 2026 रोजी निवडणूक झाली होती. मात्र, या निवडणुकीआधीच 17 पैकी सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.  उरलेल्या 11 जागांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी भाजप 11, शिवसेना 4आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 असा महायुतीचा फॉर्मुला ठरला होता.त्यानुसार भाजपने 11, शिवसेनेने 4आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर निवडणूक लढवली ,यापैकी भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला. नाशिकची जागा शिवसेनेला सुटली होती, परंतू भाजपचे गोकुळ गीते यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली व शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा त्यांनी पराभव केला.

संभाजीनगर -  जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विजयी झालेले महायुतीचे सुहास शिरसाट 

विधान परिषद निवडणूकीतील विजयी उमेदवार
-----------------------------------------------------------
ठाणे - रवींद्र फाटक (शिवसेना ) -  बिनविरोध 
यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) - बिनविरोध 
रायगड/रत्नागिरी - अनिकेत तटकरे (रा.काँ.) बिनविरोध 
पुणे - विक्रम काकडे (रा. कॉ.) बिनविरोध 
वर्धा/गडचिरोली - अरुण लखाणी (भाजप) बिनविरोध 
अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे (भाजप) बिनविरोध 
संभाजीनगर/जालना - सुहास शिरसाट (भाजप) विजयी 
नाशिक - गोकुळ गीते (अपक्ष) विजयी 
भंडारा /गोंदिया - अविनाश ब्राह्मणकर (भाजप) विजयी
सांगली/सातारा -  धैर्यशील कदम (भाजप) विजयी
परभणी/हिंगोली - सईद खान (शिवसेना) विजयी 
सोलापूर - राजेंद्र राऊत (भाजप) विजयी 
धाराशिव/ लातूर - बसवराज पाटील ( भाजप) विजयी 
नागपूर - राजीव पोतदार (भाजप) विजयी 
जळगांव - नंदकिशोर महाजन (भाजप) विजयी 
अमरावती - प्रवीण पोटे ( भाजप) विजयी 
बीड - अमर राजूरकर (भाजप) विजयी 

Post a Comment

0 Comments