news today, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

वैजापूर, ता.24 - राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील भगवान महावीर
रुग्णालयात बुधवारी (ता.23) रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले समाज व राष्ट्राप्रतीचे कर्तव्य पार पाडले. 

    रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना नगराध्यक्ष डॉ.दिनेश              परदेशी, नगरसेवक विशाल संचेती, दशरथ बनकर आदी 

शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष डॉ, दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील, सभापती दशरथ बनकर, विशालशेठ संचेती,वमाजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, कैलास पवार, मंजाहरी गाढे, देविदास वाणी, लिमेश वाणी तसेच नगरसेवक राजेश गायकवाड, प्रशांत कंगले, डॉ.बी.बी.शिंदे, दिनेश राजपूत, विनोद राजपूत, सागर राजपूत, प्रेम राजपूत, सावनसिंह राजपूत, गणेश खैरे,शैलेश पोंदे, सुरेश तांबे, प्रा.जवाहर कोठारी, प्रकाश माळी,बजरंग मगर, कल्याण काळे, भीमाशंकर साखरे यांची उपस्थिती होती.   

पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ. सविता निकाळे, निर्मला जाधव, अशोक गाडेकर, श्रीमती सिरसाट यांनी सहभाग नोंदविला. सदरील रक्त संकलन छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्त पेढीने संकलित  केले. या पेढीचे प्रमुख आप्पासाहेब सोमासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments