जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम 1 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाला. याच दिवसापासून अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. 2 जूनपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. बुधवारी मात्र दहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाढे, आमदार संजना जाधव, दर्शना राठोड, दादाराव वानखेडे, बाबुराव पवार, अब्दुल समीर अब्दुल सत्तार, अबुल जावेद अब्दुल वाहेद, मनोज राठोड यांचा समावेश आहे.
भाजपचे मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील, आ.रमेश पाटील बोरनारे, आ अब्दुल सत्तार, भाजपचे डॉ.दिनेश परदेशी, संजय जाधव (गंगापूर) दिलीप बनकर, अर्जुन पाटील हेही निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याचे समजते.
0 Comments