news today, घायगांवजवळ आयशर व टेम्पोची सामोरासमोर धडक ; 20 जण गंभीर जखमी

वैजापूर, ता 04 - वैजापूर - गंगापूर रस्त्यावर घायगांवजवळ आयशर व टेम्पोची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले. गुरुवारी (ता.04) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

  टेम्पोमध्ये अडकलेल्या वऱ्हाडींना बाहेर काढताना                घटनास्थळी उपस्थित असलेले नागरीक 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैठण येथून येवला येथे लग्नाचा वऱ्हाड घेऊन नाशिककडे निघालेल्या आयशर व विरुध्द दिशेने येणाऱ्या टेम्पोची वैजापूर - रस्त्यावरील घायगांव पाटीजवळ सामोरासमोर धडक झाली. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून जखमींना शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपस्थित नागरीक व पोलिसांनी वाहनांमध्ये अडकलेल्या वऱ्हाडींना बाहेर काढले.




Post a Comment

0 Comments