news today, वऱ्हाडाच्या टेम्पोला वैजापूरजवळ झालेल्या अपघातातील दोघांचा मृत्यू

अपघातात 19 जखमी  ; जखमी झालेले सर्व जण हे पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवासी ...

वैजापूर, ता 05 - वैजापूर - गंगापूर रस्त्यावर घायगाव शिवारात लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी (ता.04) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण ठार तर 19 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पैठण येथून येवला (जि. नाशिक) येथे वऱ्हाड घेऊन जात असलेला टेम्पो (क्र. एम. एच. 20, इ.जी.0158) व समोरून येणाऱ्या आयशर ट्रकची (क्र. जी. जे.27, टी. इ.5535) सामोरा समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातात 
गणेश रामचंद्र जाधव (30 वर्ष), अजय बाजीराव वाघ (18 वर्ष), विशाल जाधव (18 वर्ष), किसान वामन वाघ  (20 वर्ष), रंजीत गुलाब वाघ (25) वर्ष) जयसिंग रतन वाघ (22 वर्ष ), राम कल्याण वाघ (20 वर्ष) ज्ञानेश्वर रूपचंद वाघ (20 वर्ष) जितेंद्र वाघ (19 वर्ष), शालिनी किशन सोनवणे (35 वर्ष) सिद्धू वाघ (19 वर्ष ),अनिल संपत वाघ (20 वर्ष) ,कैलास वाघ (20 वर्ष) चेतन वाघ ( 25 वर्ष) सुनील वाघ (30 वर्ष) सोन्या वाघ ( 20 वर्ष) ,संतोष वाघ ( 20 वर्ष) अजय सोनवणे (20 वर्ष) ,अनिता वामन वाघ (35 वर्ष) यांच्यासह दोन अनोळखी पुरुष अशा 21 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर रुपचंद वाघ (वय 20 वर्ष) व अनिता वामन वाघ (वय 35 वर्ष) या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत पावलेल्या दोघांसह सर्व जखमी हे पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवाशी आहेत.

या अपघातानंतर वैजापूर पोलिस व या महामार्गाने जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडीने जखमींना मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी जेसीबी व टोविंग कारच्या सहाय्याने टेम्पोच्या भागातून फसलेल्या प्रवाश्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र अडथळा येत असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे प्रमोद जटाळे व अमोल काळे या कर्मचाऱ्यांनी तातडीने समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीमला संपर्क साधला. परिसरातील नागरिक व एसआरपीएफ पोलीस यासोबतच स्थानिक पोलीस यांनी देवदूत बनत शर्तीच्या प्रयत्नानंतर फसलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना रुग्णवाहिका चालक शुभम गायकवाड, राहुल पेहरकर, अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, महेश बुणगे, पंकज ठोंबरे, शेख रियाज शेख अकील, पप्पु लांडे यांनी जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी मदतकार्य केले. शहरातील खासगी डॉक्टर डॉ.दिनेश राजपूत, डॉ. चैतन्य तांबे, डॉ.उध्दव सोनवणे, डॉ .परेश भोपळे यांनीही शासकीय रुग्णालयात धाव घेऊन अपघातातील जखमींवर उपचारासाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments