जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गजांचा पराभव ...

वैजापूर, ता.09 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वैजापूर तालुक्यात शिवसेनेने पंचायत समितीच्या 16 पैकी 7 जागावर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4, भारतीय जनता पक्षाने 2, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या 8 जागापैकी शिवसेनेने 3, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 2, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला.
     
येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात 16 टेबलवर मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांनी सर्व निकाल घोषित केले. निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती.

पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने तालुक्यातील घायगाव, लासूरगाव, पालखेड, संवंदगाव, जरूळ, बोरसर व मनूर या सात गणांत विजय मिळवला. या गणातील विजयी उमेदवार पूढीलप्रमाणे

घायगाव - भगवान पोपट साठे (५२३७ मते), 
लासूरगाव - अर्चना आप्पासाहेब शेलार (४७९७),
पालखेड -  राहुल शिवाजी शेळके (६२७८)
संवंदगाव -  वंदना बाळू शिंदे (५४२२)
जरूळ - सुनील कारभारी कदम (४३४२)
बोरसर - मीनाक्षी दादासाहेब पवार (४२७८)
मनूर  - राजीव सुदाम साळुंके (५८३२):

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वीरगाव, वांजरगाव, लाडगाव व वाकला या गणांत विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार ...

वाकला  - परिगाबाई पंढरीनाथ पवार (४४०७)
विरगाव - कांता सोपानराव बारसे (५२१६)
वांजरगाव - मीनाबाई प्रताप धोर्डे (५४५६)
लाडगाव - राहुल बाबासाहेब लांडे (४८४३)

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने शिऊर गणांत सोनाली किशोर जाधव या उमेदवाराला विजय मिळवून दिला त्यांना ३५१५ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाने नागमठाण व महालगाव या दोन गणांत विजय मिळवला. महालगाव गणातून शीतल राहुल आल्हाट या ४९९६ मते मिळवून विजयी झाल्या तर नागमठाण गणातून देविदास अण्णासाहेब सामसे यांनी ४९५७ मते मिळवून विजयश्री खेचून आणली. खंडाळा गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब  ठाकरे ) पक्षाचे हुसेन शहाबुद्दीन शेख हे ३२८७ मते मिळवून विजयी झाले. पोखरी गणातून राधिका ज्ञानेश्वर ठुबे या ४७९० मते मिळवून विजयी झाल्या.

जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने संवंदगाव, लासूरगाव व घायगाव या गटात सरशी केली  संवंदगाव गटातून निताताई दिपकसिंग राजपूत (९१५७), लासूरगाव गटातून संगीता सुभाष तांबे (१०, ६५५) व घायगाव गटातून श्रीराम सजनराव गायकवाड (११३४३) हे उमेदवार विजयी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोरसर व शिऊर गटात विजय मिळवला. शिऊरमध्ये संजय मच्छिन्द्रनाथ निकम यांनी ११०५० मते मिळवत विजय मिळवला. बोरसर गटात कल्याण (मनोज) सुभाष गायके यांनी ११५०३ मते मिळवून निकटचे प्रतिस्पर्धी अजय पाटील चिकटगांवकर यांचा पराभव केला. भारतीय जनता पक्षाचे अविनाश अशोक गलांडे हे सर्वाधिक १२००२ मते मिळवून महलगाव गटात विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंकज सुधाकर ठोंबरे यांनी वांजरगाव गटात ११२०६ मते मिळवत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांचा पराभव केला. वाकला गटातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार पार्वतीबाई रामहरी जाधव या ८२३६ मते मिळवून विजयी झाल्या.