देश न सोडण्याच्या अटीवर जामीन ...
छञपती संभाजीनगर, ता.11- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील सुमारे 125 कोटींच्या गैरव्यवहाराच्या दोन गुन्हयातील एका प्रकरणात बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार सुभाष झांबड यांना अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश रा. दा. पाटील यांनी काही अटी - शर्तीवर मंगळवारी (ता.10) जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह न्यायालयाच्या पूर्ण सुनावणीच्या तारखांना हजेरी लावणे, विदेशात जाण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही,आदी अटी - शर्तीचा समावेश आहे.
सुभाष झांबड यांना मागील आठवड्यात अन्य एका गुन्हयात सर्वोच्च न्यायालयातही जमीन मिळाला आहे.अजिंठा अर्बन को - ऑप.बँकेत बनावट ठेवी दाखवून विनातारण कर्ज देऊन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्यानंतर सीटी चौक पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही ठेवीदारांनीही आपली फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
0 Comments