news today, जिल्हा सहकारी बँकेसाठी आ. बोरणारे, डॉ. दिनेश परदेशी व बाळूसेठ संचेती यांच्यासह 13 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

वैजापूर, ता.05 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी वैजापूर तालुक्यातून 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेचे आ.रमेश पाटील बोरनारे, भाजपचे नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती व आप्पासाहेब रामकृष्ण पाटील या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी आ.रमेश पाटील बोरनारे यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान आदी ...

या निवडणुकीसाठी वैजापूर तालुक्यातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून आ.रमेश पाटील बोरनारे, आप्पासाहेब रामकृष्ण पाटील, ॲड. प्रमोददादा जगताप, पाटणी रिखबचंद शिखरचंद,  सोनवणे मंदाबाई गोरखनाथ, पटेल परवीन नबी या सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी बिगर शेती मतदार संघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे  तर भटक्या विमुक्त जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

महिला प्रतिनिधी मतदार संघातून जाधव पार्वताबाई रामहरी जाधव, निकम शोभा संजय, थोट छायाबाई राधाकिसन व पटेल परवीन नबी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून मगर पूनम ज्ञानेश्र्वर (तलवाडा) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments