news today, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 214 उमेदवारी अर्ज दाखल ; आ.विलास भूमरे बिनविरोध

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, आ.अंबादास दानवे, आ. रमेश पाटील बोरनारे, डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह दिग्गजांचा समावेश 

23 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ; अर्ज माघारीनंतर 24 जूनला चित्र स्पष्ट होणार !

उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आ.रमेश बोरणारे, आ .प्रदीप जयस्वाल आदी ...

वैजापूर, ता.06 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी विविध मतदार संघातून एकूण 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (ता.05) हा शेवटचा दिवस होता. पैठण सोसायटी मतदारसंघातून आ.विलास भुमरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. 23 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

.     आ.अंबादास दानवे उमेदवारी अर्ज दाखल करताना ...

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदार संघ (67), बिगर शेती मतदार संघ (49), कृषी पणन/शेतमाल प्रक्रिया मतदारसंघ (9), वैयक्तिक सभासद मतदार संघ (1), महिला प्रतिनिधी मतदारसंघ (38), अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ (19), इतर मागासवर्गीय मतदार संघ (17), विमुक्त जाती/ भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (14) असे एकूण 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालक मंत्री संजय शिरसाट, आ.अब्दुल सत्तार, आ.रमेश बोरनारे

मतदार संघ व उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांची नांवे पुढीलप्रमाणे...

सोसायटी मतदारसंघ - आ.रमेश पाटील बोरनारे, आप्पासाहेब रामकृष्ण पाटील  (वैजापूर), आ.रंजना जाधव, अर्जुन नितीन पाटील , गोकुळसिंग राजपूत (कन्नड), आ.विलास भुमरे (पैठण), खा.कल्याण काळे, अभिजित देशमुख (संभाजीनगर), सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण (फुलंब्री), अर्जुन गाढे, ज्ञानेश्र्वर मोटे (सिल्लोड), प्रभाकर काळे (सोयगाव), जयराम साळुंके, संजय जाधव, इंदुमती साहेबराव पाटील डोणगांवकर (गंगापूर) किरण बाबूराव काळे (खुलताबाद) 
बिगर शेती मतदार संघ - मंत्री अतुल सावे, आ.अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन रवींद्र बन्सीलाल संचेती, अभिजित देशमुख, एकनाथराव जाधव, दिलीप बनकर, बादशाह पटेल, नीलिमा किरण पाटील, रमेश राजाराम पाटील, देवयानी डोणगांवकर, जगन्नाथ काळे, अर्जुन नितीन पाटील, सुमित नामदेवराव पवार, तुषार शिसोदे 
कृषी पणन/शेतमाल प्रक्रिया मतदारसंघ - अब्दुल समीर अब्दुल सत्तार, अर्जुन नितीन पाटील, निशांत नितीन पाटील, काकासाहेब फरकाडे, शहानवाज खान 
वैयक्तिक सभासद मतदार संघ - अब्दुल जावेद अब्दुल वाहेद 
महिला प्रतिनिधी मतदारसंघ - अनुराधा चव्हाण, देवयानी पाटील डोणगांवकर, नीलिमा किरण पाटील, सुवर्णा संजय जाधव, पार्वताबाई रामहरी जाधव, शोभा संजय निकम, मंदाबाई राठोड, परवीन नबी पटेल, श्रद्धा संतोष माने, हर्षदा एकनाथ जाधव 
अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ - पालक मंत्री संजय शिरसाट, हर्षदा संजय शिरसाट ,राजू शिंदे, दादाराव वानखेडे, सुरेश जाधव, भास्कर लहाने
इतर मागासवर्गीय मतदार संघ - सुवर्णा संजय जाधव, जयराम साळुंके, श्रद्धा संतोष माने, पूनम मगर, गोकुळसिंग राजपूत, नंदकिशोर सहारे, सुहास शिरसाट, किशोर धनायत
विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ -  डॉ.दिनेश परदेशी, मनोज राठोड, बाबूराव पवार 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवार ता.5 जून ही शेवटची तारीख होती. 8 जूनला अर्जांची छाननी होईल.9 जूनला वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असून 9 ते 23 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. 24 जूनला अंतिम यादी व चिन्ह वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी 4 जुलै रोजी मतदान होणार आहे. 5 जुलैला मतमोजणी होईल.








Post a Comment

0 Comments