आवेज खान
---------------------
वैजापूर, ता.19 - शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या त्यातही वैजापूर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची 115 पदे मंजूर पदे असताना केवळ 58 कर्मचारीच वैजापूर पोलीस ठाण्याचा कारभार पाहतात. 55 कर्मचाऱ्यांनी पदे रिक्त असून रिक्त असलेली ही पदे त्वरित भरण्यात यावीत अशी मागणी होत आहे.
वैजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत वैजापूर शहरासह खंडाळा व लासूरगांव परिसरातील काही गावांचा समावेश आहे. वैजापूर शहराची लोकसंख्या 50 हजारपेक्षा जास्त आहे. वाढती लोकसंख्या व शहरीकरण लक्षात घेता पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे. पोलिस.निरीक्षकाची दोन पदे मंजूर असताना एकच पोलीस निरीक्षक आहे. सहायक पोलिस निरीक्षकांची तीन पदे मंजूर असून सध्या ही तीनही पदे रिक्त आहेत.7 पोलीस उपनिरीक्षकाची पदे मंजूर असताना केवळ 3 पोलीस उपनिरीक्षक काम पाहत आहेत. सहायक फौजदाराची 8 पदे मंजूर असताना चारच हजर आहेत. पोलिस हवालदारांची 22 पदे मंजूर असून सध्या 15 हवालदार कार्यरत आहेत. 7 हवालदार कमी आहेत. पोलीस नाईकाची 24 पदे मंजूर असताना केवळ एक पोलीस नाईक आहे. ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबलची 47 पदे मंजूर असताना 34 कॉन्स्टेबल कामावर नियुक्त असून 13 कॉन्स्टेबल कमी आहेत.
0 Comments