news today, चिकटगांव - वाकला शिवरस्ता मोकळा करा ; महिलांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

वैजापूर, ता.18 - तालुक्यातील चिकटगांव ते वाकला शिवरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी तलवाडा (ता. वैजापूर) येथील ग्रामस्थ आणि महिलांनी वैजापूर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठाण मांडले.

 रस्त्याच्या मागणीसाठी वैजापूर तहसील कार्यालयात      ग्रामस्थ व महिलांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

चिकटगाव–वाकला शिवरस्ता मोकळा करण्याबाबतचे प्रकरण सन 2023 पासून सुरू असून संबंधित नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तलवाडा परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाले.

आंदोलकांनी प्रशासनाकडून तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार असल्याने प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आली.


Post a Comment

0 Comments