news today, वैजापूर - रेल्वे स्टेशन रोडवर डिव्हायडर लावलेल्या झाडांमुळे अपघाताची शक्यता

झाडांची कटींग करून उंची कमी करण्याची मागणी ...

वैजापूर, ता.12 - वैजापूर - रोटेगाव रेल्वे स्टेशन रस्त्यावर म्हसोबा चौकाजवळ डिव्हायडर लावण्यात आलेली झाडे मोठी झाली असून या झाडांमुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने येणारी जाणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून या झाडांची कटींग करून उंची कमी करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
 
शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावर सेंट मोनिका इंग्रजी शाळा,  हलकए - दवानायक उर्दू शाळा, करुणा निकेतन शाळा या तीन शाळा असून विद्यार्थ्यांची गर्दी तसेच रहदारीही मोठ्याप्रमाणात सुरू असते. वाहनांची वर्दळ व आजुबाजुला राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाही असल्याने म्हसोबा चौकाजवळ नेहमीच गर्दी असते. या रस्त्यावरील डिव्हायडरवर लावलेली झाडे वाढलेली असून या झाडांमुळे दोन्ही बाजूने येणारी जाणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे दीड दोन वर्षांपूर्वी म्हसोबा चौकाजवळ अपघात होऊन सायकलवर  शिकवणी वर्गाला जात असलेल्या सेंट मोनिका शाळेच्या दुसाने नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ही घटना घडूनही स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

म्हसोबा चौकाजवळ.रस्त्याच्या डिव्हायडरवर लावण्यात आलेल्या झाडांची कटींग करून त्यांची उंची कमी करण्यात यावी किंवा वाढलेली ही झाडे काढण्यात यावी अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख आवेज खान व अफसर सय्यद यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments