हालचालींना वेग ; प्रतिनिधींच्या नावाचे ठराव घेण्यासाठी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकांचा सपाटा
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 26, 27आणि 73 क - अ नुसार ठराव घेऊन सोसायटी/संस्था प्रतिनिधींची संचालक मंडळाच्या मंजुरीने केली जाते. ठराव करणारी संस्था थकबाकीदार नसावी,तसेच निवडणुकीसाठी पात्र असावी. संस्थेच्या अधिकृत बैठकीत प्रतिनिधींचे नाव निश्चित करून ठरावाची प्रत ई -3 किंवा ई -3 (1) नमुन्यात तयार केली जाते. या ठरावावर संस्थेच्या अध्यक्षांची सही व शिक्का तसेच सहकार अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते.
मागील महिन्यातच विभागीय सहनिबंधक कार्यालयाने यासंबंधीचे पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकारी संस्थाना पाठविले त्यानुसार जिल्हयातील सहकारी संस्था राजकीय हालचाली वाढल्या असून भाजपने मतदार वाढविण्याच्या दृष्टीने रणनीती आखली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध संस्था, सोसायटीचे प्रतिनिधींच्या नावे ठराव घेण्यावरून ग्रामीण भागात बैठकांचा सपाटा सुरू आहे.
0 Comments