वैजापूर, ता .05 - पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या गोवंश जातीच्या 22 लहान मोठया जनावरांची वैजापूर पोलिसांनी मुक्तता केली. शनिवारी (ता.04) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपये किंमतीची जनावरे हस्तगत करून त्यांची रवानगी सुरक्षित ठिकाणी केली आहे. या प्रकरणी एका शेडचा मालक असलम कुरेशी व उत्तरमुखी अन्य शेडचा अज्ञात मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैजापूर - बेलगाव रस्त्यावरील खंडोबानगर भागात असलेल्या तीन पत्र्याच्या शेडवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
वैजापूर - बेलगाव रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकून जनावरांची मुक्तता केली...
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
बेलगाव रस्त्यावरील एका शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे दातीवाटीने बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह उपनिरीक्षक नलावडे, नागरगोजे, पाडळे, हेड कॉन्स्टेबल योगेश झाल्टे, किसन गवळी, अविनाश भास्कर, गणेश काळे, प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अमोल कांबळे, नवनाथ केरे, अजित नाचन, गणेश कुलट आणि रंजीत चव्हाण यांच्या पथकाने तेथे छापा मारून पाहणी केली असता तेथे बांधून ठेवलेली छोटी मोठी 22 जनावरे आढळून आली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. .
.
0 Comments