crime news, नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक ; पैसे उकळून उत्तराखंड मध्ये डांबले

सुटका करून पळून आलेल्या तरुणांची पोलिसात तक्रार ...

वैजापूर, ता.06 - वैजापूर शहर ग्रामीण भागतील काही तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून व त्यांच्याकडून पैसे उकळत त्यांना उत्तराखंड येथे डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. .या प्रकरणात जवळपास 30 - 40 तरुणांनी वीरगाव पोलिस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिला आहे.


याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील काही तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील रुद्रपूर तालुक्यातील छत्रपुर गावात बोलावून घेण्यात आले. तेथे गेल्यावर यातील काही तरुणांकडून 35 हजार व काहींकडून त्यापेक्षाही अधिक रक्कम रोख स्वरूपात आरोपींनी घेतली व त्यांना ट्रेनिंग दिलीं जाईल असे सांगण्यात आले. मात्र जेव्हा प्रत्यक्षात ट्रेनिंग सुरू झाली तेव्हा तरुणांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ट्रेनिंग दरम्यान तरुणांना आणखी तरुण जोडावे लागतील व जोडलेल्या एक तरुणामागे त्यांना अडीच हजार रुपये मिळतील असे सांगण्यात आले. यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यांना तेथे डांबून ठेवले गेले होते. नातेवाईकांचे फोन आले तर फोनवर तेथे आरोपी सांगतील तसेच बोलावे लागायचे व तेथून बाहेर देखील जाण्यास मनाई होती. मात्र यातील काही तरुण तेथून कसे बसे पळून घरी परतले व घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. यानंतर या तरुणांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत लेखी तक्रार दिली.

तरुणांना जोडण्यासाठी  सायकॉलॉजीचे क्लास ...

अडकलेल्या तरुणांनी अन्य तरूणांना आकर्षित करावे यासाठी सायकॉलॉजीचे लेक्चर दिले जायचे.या चेनमध्ये मित्रांना कसं अट्रॅक्ट करायचं यासाठी विशेष सायकॉलॉजीचे लेक्चर दिले जायचे.ज्यामध्ये चेहऱ्यावरचे हाव भाव, कधी काय बोलायचे हे त्यात शिकवले जायचे.

शेकडो तरुणांची फसवणूक , ग्रुप करून ठेवले ...

या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये शेकडी तरुण अडकलेले होते. या तरुणांना वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये ठेवले जायचे आणि एका बिल्डिंगच्या मुलांना दुसऱ्या बिल्डिंगच्या मुलांनसोबत भेटू दिले जात नव्हते.

अजूनही काही तरुण उत्तराखंडमध्ये ....

फसवणूक झालेले अनेक तरुण अजूनही उत्तराखंडमध्ये डांबून ठेवलेले असून आम्ही कसे बसे तेथून सुटलो.आमची सरकारी नोकरी लावायच्या नावाखाली फसवणूक केली गेली अशी प्रतिक्रिया फसवणूक झालेल्या तरुणांनी माध्यमांशी बोलताना दिली.

चौकशी करून कारवाई करणार - सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे

या प्रकरणात आमच्याकडे लेखी तक्रार आली असून चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments