news today, भाजपा स्थापना दिनानिमित्त वैजापुरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वैजापूर, ता.06 - भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिन तसेच 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या  यशाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा  सत्कार सोहळा सोमवारी (ता.06) उत्साहात संपन्न झाला.

वैजापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पंचायत समिती सदस्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी अकील सेठ, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष शेख रियाज, कैलास पवार, नगरसेवक प्रकाश पाटील चव्हाण, शैलेश चव्हाण, देविदास वाणी, दिनेश राजपूत, गणेश खैरे, सचिन वाणी, शैलेश पोंदे, प्रेम राजपूत, भाजप महिला आघाडीच्या जयमाला वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येंने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments