news today, वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ.अरविंद हरबडे


वैजापूर ता.06 - येथील वैजापूर उपजिल्हा रुग्णालय रिक्त जागी बीड येथून बदलून आलेले डॉ.अरविंद हरबडे यांनी 1 एप्रिल रोजी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला.

   नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिक्षक डॉ,अरविंद हरबडे     यांचे स्वागत करतांना धोंडिरामसिंह राजपूत ...

उपजिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले डॉ. अरविंद हरबडे यांचे जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनी स्वागत केले. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रणजित चव्हाण, महेश बुणगे यांनीही त्यांचे स्वागत केले. वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्याचा मानस यावेळी डॉ. हरबडे यांनी व्यक्त केला..या समयी कार्यालयीन कर्मचारी किसन चौधरी तसेच मनोज गायकवाड यांचीही उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments