वैजापूर, ता.०४ - सात फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वैजापूर तालुक्यातील दोन लाख २३ हजार ९४७ मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. यात एक लाख १६ हजार ९४३ पुरुष मतदार असून महिला मतदारांची संख्या एक लाख सात हजार चार एव्हढी आहे. वैजापूर तालुक्यात ज़िल्हा परिषदेचे आठ गट असून पंचायत समितीचे सोळा गण आहेत. या निवडणुकीत मतदान प्रक्रियेद्वारे आठ जिल्हा परिषद सदस्य व सोळा पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे.
मतदाराच्या दृष्टीने बघितल्यास वाकला जिल्हा परिषद वाकला हा सर्वात मोठा गट असून यात सोळा हजार ९३ पुरुष व १४ हजार ३६५ महिला असे ३० हजार ४५८ मतदार आहेत. या गटात पंचायत समितीचे वाकला व पोखरी हे दोन गण आहेत. त्यापाठोपाठ बोरसर गटात बोरसर व मनूर हे पंचायत समितीचे गण मिळून २९ हजार ७७२ मतदार आहेत. शिऊर गटात (शिऊर व खंडाळा गण) २९ हजार ५२७ मतदार, संवंदगाव गटात (संवंदगाव व जरूळ) २९ हजार ३९३ मतदार, लासूरगाव गटात (लासूरगाव व पालखेड) २७ हजार ९४४ मतदार, घायगाव गटात (घायगाव व लाडगाव) २५ हजार ५२७ मतदार, वांजरगाव गटात (वांजरगाव व विरगाव) २५ हजार ३४५ मतदार व महालगाव गटात (महालगाव व नागमठाण) २५ हजार ९८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पंचायत समितीच्या सोळा गणातील मतदारसंख्या पुढीलप्रमाणे
वाकला- १६४७३
पोखरी - १३९८५
मनूर- १५,६६३
बोरसर -१४१०९
शिऊर- १४७३३
खंडाळा -१४७९४
जरूळ -१३९७४
संवंदगाव-१५४१९
पालखेड-१३३८५
लासूरगाव-१४५५९
घायगाव -१२९०८
लाडगाव -१२६१९
वांजरगाव-१२०९२
विरगाव-१३२५३
महालगाव -१३१६७
नागमठाण-१२८१४
0 Comments