वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणाची मतमोजणी विनायकराव पाटील महाविद्यालयात...
छत्रपती संभाजीनगर, ता.06 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मतदान शनिवार ता.07 रोजी (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत) तर मतमोजणी सोमवार, ता.09 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे.
प्रशासनाने मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित केली असून तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे-
1. सोयगाव तालुकाः- तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत, सोयगाव.
2. सिल्लोड तालुकाः-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यशवंत महाविद्यालयाच्या पाठीमागे, सिल्लोड.
3. कन्नड तालुकाः- छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा इन-डोअर हॉल, कन्नड.
4. फुलंब्री तालुकाः-तहसील कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, फुलंब्री.
5. खुलताबाद तालुकाः- कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खुलताबाद.
6. वैजापूर तालुकाः- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर.
7. गंगापूर तालुकाः- मुक्तानंद महाविद्यालय, इनडोअर स्टेडियम,गंगापुर
8. छत्रपती संभाजीनगर तालुकाः- शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.
9. पैठण तालुकाः संतपीठ पैठण येथील प्रशासकीय इमारत, पैठण.
0 Comments