news today, मर्चंट बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक जोशी यांचे निधन

वैजापूर, ता.23 - येथील वैजापूर मर्चंटस को.ऑपरेटिव्ह बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक गोपाळराव जोशी यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता.22) निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 72 वर्ष होते.

.                                            अशोक गोपाळराव जोशी 

त्यांच्या पार्थिवावर शहरातील अमरधाममध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. या समयी आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, भगवान तांबे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशशेठ बोथरा, राजेंद्र साळुंके, धोंडीरामसिंह राजपूत, जेष्ठ पत्रकार घन:श्याम वाणी, विजय वेद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कै.अशोक जोशी यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. वर्धमान बँकेतील रोहित जोशी यांचे ते वडील होत. तर सेवानिवृत्त कक्ष अधिकारी नंदकुमार जोशी यांचे ते बंधू होत.

Post a Comment

0 Comments