वैजापूर, ता.18 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.17) श्री गुरु गणेश मिश्री गोपालन सेवा संघ, घायगाव तालुका वैजापूर या गौशाळेत गौमातांना घास, चारा, गुळ, चनादाळ, केळी इत्यादी देऊन त्यांची सेवा व पुजन करण्यात आले. 17 देशी वृक्ष वड, पिंपळ, लिंब यांचे वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले...
भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य प्रशांत कंगले, उद्योग आघाडी अध्यक्ष निलेश पारख, युवानेते विश्वराज परदेशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश खैरे, प्रेम राजपूत, सचिव संदीप पवार, प्रदीप चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आदमाने, दामोदर पारिक, तालुका सरचिटणीस सुनील गायकवाड, गौरव दोडे, नितीन जोशी, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष शैलेश पोंदे, सोशल मीडिया प्रमुख गिरीश चापानेरकर, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष प्रवीण सावंत, सन्मित खनिजो, धीरज बोथरा, विनय संचेती, विशाल टेके, मन की प्रमुख किरण खरोटे, अनिल व्यवहारे, संजय संचेती, भुषण बोथरा, बाबुराव शिंदे, सुनिल साठे, मनिष गुर्जर, भागचंद गुर्जर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभावे यासाठी विविध घोषणा देत प्रार्थना करण्यात आली. भारतमाता की जय, गौमाता की जय, जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण गोशाळेचा परीसर परिसर दणाणून गेला होता.
0 Comments